कोरोनाव्हायरस घेऊन आला नकारात्मक मानसिक रोग

नकारात्मक वातावरणात राहणारा सामान्य व्यक्ती जेव्हा नकारात्मक मानसिकतेचा शिकार होतो. तेव्हा त्याच्याकडे यावर उपाय करण्यासाठी साधन खूप सामान्य असतात त्यामुळे त्यांच्यावर ही बिमारी जास्तच हवी होते अशावेळी आपल्या चिकित्सा करण्याचे जे उपाय असतील ते तर कराच परंतु अध्यात्मिक उपाय हे आपल्यातील सकारात्मकता वाढवतील. जशी ही सकारात्मकता आपल्या विचारात व व्यवहारात उतरते तसा याचा सरळ परिणाम आपल्या शरीरावर होतो. जितकी सकारात्मक विचार वाढतील तितके आपले स्वास्थ चांगले राहते.
नकारात्मकतेचे केंद्र हे आपले मन असते. ते आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या सातत्याने नकारात्मक गोष्टी,चर्चा,बातम्या वातावरणाचा आपले मन सातत्याने नकारात्मक विचार करते. उलट सुलट विचार हे प्रवाहित करत राहते. अशावेळी आपले मन लागत नाही काम, क्रोध, चिडचिडपणा वाढतो आणि या गोष्टीचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. अशात आपल्याला डॉक्टर औषध देत असतील तर ते सुद्धा काम करत नाही.अशावेळी आपल्याला आपल्या मनावर काम करावे लागेल हे कार्य एका दिवसात शक्य नाही यासाठी आपल्याला दररोज वेळ काढून यावर काम करावे लागेल. आपण सर्वच श्री हनुमान जी यांची बलोपासना जाणताच. श्री हनुमान चालीसा हा एक मेडिटेशन साठी चांगला कारगर उपाय आहे. आपण सकाळी दररोज हनुमान चालीसा वाचू शकता.त्याच सोबत व्यायाम, सूर्यनमस्कार, योग यांना आपल्याला दिनचर्येत जोडून घ्यावे लागेल. या दैनंदिन कार्यामुळे आपण आपल्याला जोडून घेण्यास मदत होईल मन नियंत्रित झाल्यामुळे शरीरावर याचा चांगला परिणाम दिसून येईल कारण आपण आतून सक्षम झालेला असू. जगात अशी एकमेव कृती जी भारतीय संस्कृतीमध्ये आहे जी आपल्याला आपल्याशी जोडते.बाकीच्या तर भौतिकसंसाराला जोडण्यासाठीच कामाला येतात.
तर उद्या श्री हनुमान जी यांची जयंती आहे तर आपण या दिवशी सर्व कुटुंब एकत्रित येऊन निरोगी आरोग्यसंपन्न होण्याचा निर्धार करू शकतो.

Leave a Comment